राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन

Aug 14 2017 10:49PM
मुंबईः संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आदीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी सुकाणू समितीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वेसंध्येलाच राज्यात ठिक ठिाणी चक्का जाम करत सरकारविरोधात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिकच्या पळसे महामार्गावर आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर, सटाणा आणि त्र्यंबक रोडरव शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत धरणे धरली.