राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन

Aug 14 2017 10:49PM
मुंबईः संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आदीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी सुकाणू समितीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वेसंध्येलाच राज्यात ठिक ठिाणी चक्का जाम करत सरकारविरोधात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिकच्या पळसे महामार्गावर आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर, सटाणा आणि त्र्यंबक रोडरव शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत धरणे धरली. औरंगाबादच्या क्रांती चौकातही सुकाणू समितीच्या शेकडो आंदोलकांनी रास्ता रोका केला. तर, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. बीडच्या धारूरमध्येही शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून सरकारचा निषेध नोंदविला. परभणी तसेच अहगदनगरच्या राहुरी आणि पुणतांबा येथेही शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. प्रहार संघटनेने वर्धा-हिंगणघाट मार्गावर रास्ता रोखा केला. इंदापूरजवळ मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. साताऱ्यातही रास्ता रोखा करण्यात आला. पुण्यात शेतकरी आणि कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे -सातारा महामार्ग रोखून ठेवला. कराडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. नंदूरबारमध्येही शेतकऱ्यांनी रस्ते आणि महामार्ग अडवले. जळगावात बांभोरी पुलाजवळ शेकऱ्यांनी रास्ता रोखा केला. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी सुमारे अडीच तास वाहतूक अडवून ठेवली. परभणी जिल्ह्यात गंगाखेड-परभणी रस्त्यावर पोखर्णीफाटा येथे रास्ता रोखा करण्यात आला. तसेच, राज्य परिवहन मंहामंडयाच्या सात बसच्या काचा फोडण्यात आल्या. पालघर जिल्ह्यात जव्हार, सिल्वासा, नाशिक रस्त्यावर आदिवासी नृत्य करत शेतकऱ्यांनी रास्ता रोखा केला. महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वर्धामध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेकरी रस्त्यावर उतरले. नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरमध्ये आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली.