बी.जी. गायकर, डॉ. बुधवंत यांना राष्ट्रपती पोलिस पदक

Aug 14 2017 10:51PM
पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी शहर पोलिस दलातील उपायुक्त बाळशीराम गायकर, लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. या व्यतिरिक्त शहर पोलिसातील 6, ग्रामीण एक, तर राज्य राखीव दलातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.