ममता कुलकर्णी दुबईला पसार

Aug 16 2017 5:51PM
मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार झाली असल्याचे वृत्त आहे. "इफेड्रीन च्या तस्करीमध्ये ममता आणि तिचा पती विकी गोस्वामीचे नाव पुढे आले होते. अमेरिकेच्या औषध अंमलबजावणी प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये विकी गोस्वामी आणि त्याचे साथीदार इब्राहिम, बख्ताश आक्शा आणि पाकिस्तानी अमली पदार्थ वितरक गुलाम हुसैन यांना केनियातून अटक केली होती.