योगी सरकारने प्रायश्चित करावे : संघाचा सल्ला

Aug 16 2017 6:41PM
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयात प्राणवायूअभावी लहान मुलांचे 70 बळी गेले! याबद्दल राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत. अवध क्षेत्राचे आरएसएसचे प्रांत संघचालक प्रभु नारायण यांनी योगी सरकारला चक्क प्रायश्चितचा सल्ला दिला आहे.