लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन सुराज्य घडवूया : पंतप्रधान

Aug 16 2017 10:27PM
लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन सुराज्य घडवूया : पंतप्रधान नवी दिल्ली : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष यंदा साजरे होत आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाज जागृत झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना लोकमान्यांनी केली. त्यांनी दिलेल्या स्वराज्याच्या मंत्रापासून प्रेरणा घेऊन आता सुराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशवासीयांनी समर्पण भावनेने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.