चिनी सैनिकांची घुसखोरी रोखली

Aug 16 2017 10:37PM
लेह : लडाखमधील प्रसिद्ध पॅंगॉंग तलावाच्या काठावरून भारतीय क्षेत्रात घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला. भारतीय जवानांच्या अटकावापुढे हतबल झाल्यानंतर त्यांनी दगडफेक सुरू केली. त्याला भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या दगडफेकीत दोन्ही बाजूचे सैनिक किरकोळ जखमी झाले.