राज्यात तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

Aug 16 2017 10:37PM
पुणे : अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातून पावसासाठी पोषक असलेले वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. पावसाला अनुकूल असलेले वारे दोन दिवसांत राज्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात जोरदार पावसाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने बुधवारी वर्तविला आहे.