प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत

Aug 17 2017 5:35PM
मुंबई : शंभरहून अधिक गुंडांचा खात्मा करणारे चकमक फेम प्रदीप शर्मा पुन्हा एकदा पोलिस सेवेत सामिल झाले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर त्यांचे पोलिस दलात पुनरागमन झाले आहे. सध्या ते पोलिस महासंचालक मुख्यालयात पदभार स्वीकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे.