कर्नल पुरोहितच्या जामीनावर न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

Aug 17 2017 5:36PM
नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. पुरोहितच्या जामीनासाठी वकिल हरीश साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर राष्ट्रीय तपास यंत्रणाने जामिनाला विरोध केला. कर्नल पुरोहितच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय काम ठेवावा, असे राष्ट्रीय तपास यंतणेचे म्हणणे आहे.