चीनची गुर्मी कायम

Aug 17 2017 6:25PM
बिजींग : भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तरी, चीन सहजासहजी हा विषय सोडणार नाही. भारताने जी आक्रमक, चिथावणीखोर कृती केली आहे त्याची किंमत भारताला चुकवावी लागेल, अशी गुर्मीची भाषा चीनने केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डोकलामवरून उभय देशांत कमालीचे संबंध ताणले गेले आहेत. चीनकडून सातत्याने दबावतंत्राची आणि युद्धाची भाषा केली जात आहे. त्यातच दोनवेळा घुसखोरीचा प्रयत्नही झाला.