पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच; भाजप दुसऱ्या क्रमांकावर

Aug 17 2017 6:29PM
कोलकाता : पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने बाजी मारली आहे. सर्वच्या सर्व 7 महापालिकांवर तृणमूलने ताबा मिळविला. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा खीळ बसली आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूलने भाजपसह सर्वच पक्षांचा निवडणुकीत सूपडा साफ केला.