व्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा

Aug 19 2017 5:58PM
इस्लामाबाद : व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात नाराजी वाढत असून जनता पेटून उठली आहे. पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे, यासाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सामान्य जनता आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तरूणाईचा सहभागही लक्षणीय होता. जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेने ह्या मोर्चाचे आयोजन केले होते. जंदालीमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.