ब्ल्यू व्हेलच्या नादात आत्महत्येचा प्रयत्न

Aug 19 2017 6:00PM
नवी दिल्ली : दिल्लीतील अशोक विहार परिसरातील अकरावीतील एका युवकाने चाथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुश असे त्याचे नाव आहे. त्याच्या गंगाराम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कुशला ब्ल्यू व्हेल गेम खेळण्याचा नाद होता, असे बोलले जाते.