अण्णा द्रमुकच्या विलीनीकरणाचा सोमवारी निर्णय

Aug 19 2017 6:01PM
चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून अण्णा द्रमुकमध्ये सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. ओ. पनीरसेल्वम यांचा गट विद्यमान मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्याबरोबर तडजोड करायला तयार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या सोमवारी अण्णा द्रमुकमधील हे दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा करू शकतात.