नाशिक महापालिकेतही गोंधळ

Aug 19 2017 6:02PM
नाशिक : औरंगाबादपाठोपाठ नाशिक महापालिकेतही गोंधळ सुरू झाला आहे. हा गोंधळ महासभेत मांडल्या जाणाऱ्या करवाढीच्या प्रस्तावावरून झाला. ऐन वंदे मातरम्‌ गीत सुरू असतानाच नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी महापौरांकडे धावून राजदंड पळवला. यानंतर, सुरक्षा रक्षकांनी त्यांना महापौर दलनापासून दूर केले.