कर्नल पुरोहितला जामीन

Aug 21 2017 6:00PM
नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. गेल्या नऊ वर्षांपासून पुरोहित तुरूंगात आहे. आता तुरुंगाबाहेर येण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती आर.के. अग्रवाल आणि ए.एम. सप्रे यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला. पुरोहितच्या जामीनासाठी प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.