छत्तीसगडमध्ये प्राणवायूअभावी तीन बालकांचा मृत्यू

Aug 21 2017 7:07PM
रायपूर : गोरखपूरची घटना ताजी असतानाच छत्तीसगडमध्येही अशीच घटना घडली आहे. रायपूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर सरकारी रुग्णालयात प्राणवायूअभावी रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. दूसरीकडे, रायपूर पोलिसांनी चंद्रा नामक व्यक्तीस अटक केली आहे. तो रुग्णालयातील कर्मचारी आहे.