डोकलामप्रश्नी लवकरच तोडगा : राजनाथ

Aug 21 2017 7:28PM
नवी दिल्ली : डोकलामप्रश्नी लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. भारताला युद्ध आणि संघर्ष नको तर शांतता हवी आहे, असेही राजनाथ यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवळी जगात भारताला हरवू शकेल असे एकही सैन्य नाही, असेही अधोरेखित केले. इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा पोलिसांतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.