तामिळनाडूत अण्णा द्रमुकचे दोन्ही गट एकत्र

Aug 21 2017 8:14PM
चेन्नई : तामिळनाडूतील राजकीय उलथापालथ अखेर थांबलीे! अण्णा द्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम हे दोन्ही गट सोमवारी एकत्र आले. या दोन्ही गटांचे काल अधिकृत विलीनीकरण झाले. त्याचबरोबर, ओ. पन्नीरसेल्वम यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळादेखील पार पडला. तो तडजोडीचाच एक भाग मानला जात आहे.