तिहेरी तलाकप्रकरणी आज निकाल

Aug 21 2017 8:22PM
नवी दिल्ली : बहुचर्चित तिहेरी तलाक प्रकरणी आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. यासंदर्भात 11 ते 18 मे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ आज निकाल देण्याची शक्यता आहे.