मीरा-भाईंदरमध्ये कमल फुलले

Aug 21 2017 8:45PM
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेतील 94 पैकी 54 जागा पटकावित स्पष्ट बहुमत मिळविले आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्याला 17 जागा मिळाल्या आहेत. तर, कॉंग्रेस 11 जागांसह तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. जिथे अपक्षने दोन जागा मिळविल्या तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षाला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. मनसेच्या "इंजिन आणि बहुजन विकास आघाडीच्या "शिट्टी ची तिच अवस्था होती. कॉंग्रेसला मात्र आठ जागांचा फटका बसला आहे.