हुबळी एक्सप्रेसवर खंडाळा घाटात दरड कोसळली

Aug 21 2017 8:46PM
लोणावळा : मुसळधार पावसामुळे लोणावळ्याच्या मंकी हिलजवळ हुबळी एक्सप्रेसवर सोमवारी सकाळी दरड कोसळली. त्याचा मोठा दगड एक्सप्रेसवर कोसळला. त्यामुळे चार प्रवासी जखमी झाले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना घडली. या प्रकारामुळे हुबळी एक्सप्रेस तासभर उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.