तिहेरी तोंडी तलाकची प्रथा रद्द

Aug 22 2017 10:48PM
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील तिहेरी तोंडी तलाक प्रथेसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 3 विरुद्ध 2 अशा बहुमताने तिहेरी तोंडी तलाकची प्रथा घटनाबाह्य ठरवत रद्द केली आहे. तोंडी तलाक कुराणाच्या मूळ सिद्धांताचा भाग नाही, सरकारने यावर कायदा केला पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सहा महिन्यांत सरकारने कायदा केला नाही तर ही बंदी पुढे कायम असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत तोंडी तलाकवर बंदी असणार आहे.