अमेरिकेचा पाकिस्तानला सज्जड दम

Aug 22 2017 10:49PM
वॉश्ंिगटन : पाकिस्तानने यापुढे दहशतवाद्यांना थारा दिल्यास अमेरिका शांत बसणार नाही, असा सज्जड इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला आहे. त्याचवेळी पाकिस्तानला दहशतवादाविरोधातील लढ्याची आठवण करून देताना आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासही सांगितले. ट्रम्प यांनी मंगळवारी फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला.