7 सप्टेंबरला सुनावणार अबू सालेमला शिक्षा

Aug 22 2017 10:50PM
मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेमसह अन्य सहा जणांना विशेष टाडा न्यायालय 7 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहे. यातील मुस्तफा डोसाचा जूनमध्ये तुरुंगात मृत्यू झाला असून, पाच दोषींना विशेषतः अबू सालेमला काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात विशेष टाडा न्यायालयाने जूनमध्ये सालेम, डोसासह फिरोज अब्दुल रशिद खान, करिमुल्ला खान उर्फ हुसेन हबीब शेख, ताहिर महोम्मद मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्या, रियाझ सिद्दिकी यांना दोषी ठरवले होते. तर अब्दुल कय्यूम करिम शेख याची निर्दोष सुटका केली होती. बॉम्बस्फोटासाठी सालेमने गुजरातमधून मुंबईत शस्त्रसाठा आणला होता.