राज ठाकरे यांचे "व्हिजन मुळा-मुळा'

Aug 22 2017 10:53PM
पुणे : गोदापार्कच्या धरतीवर शहरातील मुळा-मुठा नदीचा विकास करणे शक्य आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते म्हात्रे पूल दरम्यानच्या नदीकाठाचे सुशोभिकरणाच्या आराखड्याचे सादरीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केले. त्यांनी महापालिकेला नदीच्या सुशोभिकरणाचे नवे व्हीजन दिले आहे. घोले रस्ता येथील आर्ट गॅलरीमध्ये आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, राज्यातील पुणे, मुंबई, ठाणेसारखी शहरे दिवसागणिक बकाल होत चालली आहेत. शहरातील नागरिकांसाठी अद्ययावत सोयी-सुविधा, चांगली उद्याने, मोकळ्या जागा आवश्यक आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील बालगंधर्व ते म्हात्रे पुलादरम्यान नदीपात्राचे सुशोभीकरण आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या विकसनाचा आराखडा तयार केला आहे. राज्यातील अनेक कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून (सीएसआर-कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी उभा करता येईल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने ट्रस्ट स्थापन करून त्यामध्ये पुण्यातील प्रतिष्ठित आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी सादर केलेला हा आराखडा बालगंधर्व ते म्हात्रे पुलादरम्यानचा रस्ता आणि परिसर नव्याने विकसित करणे, संभाजी उद्यानाची नव्याने रचना करावी लागणार आहे. खेळाची मैदाने, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी अशा प्रकारची रचना आहे. नौकाविहार आणि आधुनिक कारंजे नदीपात्रात उभारावेत अशी कल्पना मांडण्यात आली आहे. बालंगर्ध रंगमंदिर हे मल्टीफ्लेक्सच्या धरतीवर विकसित करावे. याठिकाणी एकूण तीन नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत. प्रायोगिक रंगकमीर्र्ंसाठी याठिकाणी नाट्यगृह उभारण्याची विचार आहे.