प्रभूंचा राजीनामा मोदींनी फेटाळला

Aug 23 2017 10:08PM
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "थोडं थांबा , असे सांगत प्रभू यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर प्रभू यांनी, अपघातांमुळे मला अतिशय दुःख झाले आहे. या अपघातात अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. रेल्वेमंत्री या नात्याने अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, पंतप्रधानांनी मला थोडी वाट पाहा, असे सांगितले असल्याचे ट्विवट केले आहे.