अपघातानंतर मोटारीने घेतला पेट; तिघांचा मृत्यू

Aug 23 2017 10:08PM
अपघातानंतर मोटारीने घेतला पेट; तिघांचा मृत्यू बेल्हे, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यात अपघातानंतर एका मोटारीने पेट घेतला. यामध्ये तिघा जणांचा होरपळून मृत्यू झाला. नरेश सखाराम वाघ (पिंपळवंडी, जुन्नर), दिलीप चंद्रराव नवले (बाभूळवाडा, पारनेर), प्रशांत उर्फ बंटी सुरेश चासकर (वडगाव आनंद) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही औषध विक्रेते म्हणून व्यवसाय करत होते.