उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गाला मान्यता

Aug 23 2017 10:10PM
\पुणे : पुण्यात सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेल्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला (एचसीएमटीआर) शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल. साधारणतः 36 किलोमीटरचा हा मार्ग उन्नत (एलेव्हेटेड) असणार असून यासाठी 6 हजार 646 कोटी खर्च अपेक्षित आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एचसीएमटीआरची आवश्यकता होती. आगामी 2041 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन, या रस्त्याची आखणी करण्यात आली आहे.