आकाशवाणीच्या बातमीपत्राला संपाचा फटका

Aug 23 2017 10:13PM
पुणे ः आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी वेतन न मिळाल्याने संप केला. त्यामुळे बुधवारी सकाळी 8.30 वाजता बातम्या प्रसारित झाल्या नाहीत. आकाशवाणीच्या इतिहासातील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित न होण्याची बहुधा ही प्रथमच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अनेक वर्षे दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होत होते. मात्र, खर्च कपातीचे कारण देत दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी बातमीपत्र राज्यांच्या राजधानीत हलवण्यात आली आहे.