शिर्डी विमानतळाला साईबाबांचे नाव

Aug 23 2017 10:13PM
मुंबई, (प्रतिनिधी) ः शिर्डी येथील शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट या विमानतळाचे "श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ , असे नामकरण करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार आहे. शिर्डीत साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नवीन विमानतळ सुरू करण्यात येणार आहे.