कर्नल पुरोहित तुरुंगाबाहेर

Aug 23 2017 10:14PM
नवी मुंबई ः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांची बुधवारी तळोजा तुरूंगातून सुटका झाली. तब्बल 9 वर्षानंतर पुरोहित तुरूंगाबाहेर पडले. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुरोहित यांचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर काल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. तुरूंगातूून बाहेर पडताच लष्कराच्या वाहनातून ते मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले.