खासगी जीवन हा मूलभूत अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Aug 24 2017 8:41PM
नवी दिल्ली ः तिहेरी तोंडी तलाकनंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी खासगी जीवनाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार खासगी जीवन हा मूलभूत अधिकार आहे. इतकेच नव्हे, तर घटनेतील अनुच्छेद 21 मध्ये नमूद करण्यात आलेल्या जगण्याच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारांचा एक भाग आहे, असा निर्वाळा सरन्यायाधीश जे.एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने दिला आहे.