बाप्पांचे आज आगमन

Aug 24 2017 8:45PM
पुणे : आनंदाचा क्षण घेऊन येणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. हा उत्सव सर्वांनाच दहा दिवस प्रसन्नतेची अनुभूती देऊन जातो. गणपती बाप्पा म्हणजे मांगल्याचे प्रतीक! याच मांगल्याच्या उत्सवाची अर्थांतच सर्वांच्या लाडक्या "श्रीं"चे आज (शुक्रवारी) आगमन होत आहे. "श्रीं च्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. बाजारपेठेतील खरेदीची रेलचेल वाढली असून, गणेश मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील वातावरण चैतन्याने भारावून गेले असून, सर्वांनाच आता प्रत्यक्ष बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत.