डेरा सच्चा अनुयायांचा हरयाणात धुडगूस; 28 ठार, 250 जखमी

Aug 25 2017 8:24PM
चंदीगड ः डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत बाबा राम रहीम यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरविले. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचारात 28 जणांचा मृत्यू झाला. तर, अडीचशेहून अधिक जण जखमी झाले. डेरा समर्थकांनी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत मोठा हिंसाचार घडवला. पंचकूला परिसरात अक्षरशः हैदोस घातला. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्या हातात मोठे दगड आणि शस्त्रे होती. हिंसाचार घडविण्यात महिलाही मोठ्या प्रमाणात अग्रभागी होत्या.