मंगलमय वातावरणात "श्रीं'चे आगमन!

Aug 25 2017 8:26PM
पुणे : गणेश मंडळे आणि भक्तांची बाप्पांच्या अगमनासाठी सुरू झालेली घाई, ढोल-ताशा पथकातील वादकांच्या डोक्यावर शोभून दिसणारे भगवे फेटे, "श्रीं च्या दर्शनासाठी सहकुंटूंब बाहेर पडलेले भक्तगण, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, ढोल-ताशे आणि सनर्ई चौघड्यांच्या मंगलमय सूरात बाप्पांचे शुक्रवारी आगमन झाले. सकाळीच प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यातच वरुण राजाने हजेरी लावल्याने शहरातील वातावरण अधिकच मंगलमय झालेे. "श्रीं च्या आगमनामुळे घराघरात चैतन्य पसरले आहे. पुढील 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहर भक्तिमय होणार आहे.