पुण्यासह राज्यात पावसाला सुरूवात

Aug 25 2017 8:28PM
पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुण्यासह राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काल काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. पुण्यातही सायंकाळी 5.30 पर्यंत 2.3 मि.मी. पावसाची नोंद वेधशाळेकडे झाली.