मुंबई पाण्यात!

Aug 30 2017 12:34AM
मुंबई : मुंबईसह उपनगराला मंगळवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सोसाट्याचा वारा, काळेकुट्ट ढग आणि मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना 26 जुलैची आठवण करून दिली. मुंबईत 24 तासांत तब्बल 250 मिमी हून अधिक पावसाची नोंद झाली. हे वादळ किंवा ढगफुटी नसल्याचे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले असले, तरी येत्या 24 तासांत मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.