रेल्वे रद्द, महामार्ग बंद; हजारो प्रवासी अडकले

Aug 30 2017 12:35AM
पुणे : मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई अक्षरश: थांबली आहे. मुंबई जलमय झाली असून, सर्वच रस्ते, तसेच रेल्वेमार्गावर तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या सर्व मार्गांवरील वाहने अडविण्यात आली आहेत. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या. पुण्याहून दुपारी 3.30 वाजता सुटणारी डेक्कन एक्स्प्रेस, सायंकाळी 5.55 वाजता सुटणारी इंटरसिटी एक्स्प्रेस व सायंकाळी 6.35 वाजता सुटणारी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. तसेच मुंबईतून पुण्याकडे येणाऱ्या या तीन रेल्वेही रद्द करण्यात आल्या.