तुझे वर्तन जंगली जनावरासारखे; बाबा राम रहीमला न्यायालयाने सुनावले

Aug 30 2017 12:36AM
चंडीगढ : दोन साध्वींवरील बलात्काराप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत उर्फ बाबा राम रहीम याला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने तुझे वर्तन जंगली जनावरासारखे होते, अशा शब्दात त्याची निर्भत्सना केली. शिक्षा सुनावल्यानंतर बाबाला न्यायालयाने त्याच्या पापांचा पाढाच वाचून दाखवला. ज्यांनी तुला देवाचा दर्जा दिला, तुझी पूजा-अर्चा केली, त्यांच्याशीच तू जंगली जनावरासारखा वागलास, तुला कोणत्याही परिस्थितीत माफी देणे शक्यच नाही, असे न्यायालयाने बाबाला सुनावले.