आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चच

Aug 30 2017 12:37AM
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचा हट्ट तूर्तास बाजूला ठेवत ते आहे तसे एप्रिल ते मार्चच ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न होता. मात्र, या निर्णयासाठी आवश्यक असणारा राज्यांचा पाठिंबा नसल्याने मोदी सरकारने आपला अट्टहास थांबवला आहे. मोदी सरकारच्या या कार्यकाळात तरी आर्थिक वर्ष बदलले जाणार नसल्याची माहिती केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.