श्रीनगरमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान ठार, 7 जखमी

Sep 2 2017 12:35AM
श्रीनगर : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या बसवर शुक्रवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला. पंथा चौक येथे झालेल्या हल्ल्यात एक पोलिस शहीद झाला असून इतर 7 जण जखमी झाले आहेत. या चकमकीनंतर संपूर्ण परिसर रिकामे करण्यात आले असून पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैयब्बाने घेतली आहे.