केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार

Sep 2 2017 12:36AM
नवी दिल्ली ः केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात येणार आहे. 3 सप्टेंबर रोजी मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना होणार आहेत. त्याआधी राष्ट्रपती भवनात सकाळी 10 वाजता केंद्र सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात जनता दल (यु) आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद येण्याची चिन्हे आहेत.