भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील 34 मृतदेह सापडले

Sep 2 2017 12:38AM
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेचे बचावकार्य अखेर 28 तासानंतर थांबवण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर 34 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत. मृतांमध्ये 20 दिवसांच्या बाळासह तीन वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. तर 15 जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.