डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला नोटीस

Sep 2 2017 12:40AM
मुंबई ः बॉम्बे रुग्णालयातील डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुंबईतील अतिवृष्टीत बेपत्ता झालेले डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडला होता.