कैद्यांकडून मारहाणीच्या भीतीपोटी राम रहीमला ठेवले वेगळे

Sep 2 2017 12:41AM
चंदिगड ः बलात्काराच्या आरोपाखाली कारागृहात रवानगी झालेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम याला तुरुंगामध्ये इतर कैद्यांपासून लांब ठेवण्यात आले आहे. राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे कारागृहातील कैदी संतापले असून, ते राम रहीमवर हल्ला करण्याची भीती आहे, अशी माहिती जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याने दिली आहे.