नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजले !

Sep 2 2017 12:43AM
मुंबई, (प्रतिनिधी) ः वर्षापूर्वी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद करताना पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयामुळे दडपलेला काळा पैसा बाहेर येईल व देशाची अर्थव्यवस्था रेसच्या घोडासारखी वेगवान होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र उलटेच झाले. अर्थव्यवस्थेचा खळखळता प्रवाह थांबून त्याचे डबके झाले. महागाई वाढली. देशातील 20 ते 25 लाख लोकांचा रोजगार गेल्याची खरमरीत टीका सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने केली आहे.