उत्तर प्रदेशात आणखी 49 मुले दगावली

Sep 4 2017 4:56PM
लखनौ ः उत्तर प्रदेशात लहान मुलांच्या मृत्यूचे सत्र अद्यापही सुरूच आहे. गोरखपूरपाठोपाठ फर्रूखाबाद येथेही प्राणवायूच्या पुरवठ्याअभावी गेल्या महिन्याभरात 49 मुले दगावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार हादरून गेले आहे. फर्रुखाबादच्या डॉ. राम मनोहर लोहिया रूग्णालयात ही घटना घडली आहे. प्राणवायू आणि औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.