सुल्तान अहमद यांचे निधन

Sep 4 2017 5:15PM
कोलकात्ता ः ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुल्तान अहमद यांचे हृदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून सुल्तान अहमद आजारी होते. सोमवारी सकाळी निवासस्थानी त्यांनाहृदयविकाराचे दोन झटके आले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुल्तान अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.